Abhyanga Snan

दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌ |
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥

दिव्यांचे महत्व असलेली दिवाळी, ज्याने पूर्वापार इडापीडा टळो व बळीराजाचे राज्य येवो असे म्हटले जाते. याचाच अर्थ दिव्यांच्या तेजाने जे सूर्य व अग्नीचे रुप आहे त्याने दु:ख, अंधकार, रोगराई यांचा नाश होऊ दे व सुख, आरोग्य, समृध्दी नांदू दे. याचीच सुरूवात दिवाळी पासून होते.

नरक चतुर्दशी म्हणजेच दिवाळीचा दुसरा दिवस. नरक चतुर्दशीचे दिवाळीमध्ये फार महत्व आहे. नरकासूर हा असूरांचा राजा होता. तो खूप शूर होता. असे म्हणतात की त्याने स्वर्गावर आणि पृथ्वीवर ताबा मिळवला होता. त्याची राजधानी प्रागज्योतिषपूर म्हणजे उक्षवत्या सूर्याचे राज्य. ही राजधानी अतिशय सुंदर, मोठी आणि जिंकायला अशक्य. नरकासूर इतका शक्‍तीवान होता, की त्याला कशाचीच चिंता तर कुणाचीच भीती नव्हती. त्याच्या गर्वाला काही सीमाच नव्हती. नरकासूराने पृथ्वीवरील सर्व राज्ये जिंकली. त्यातील १६००० राजकन्यांना बंदी बनवून
प्रयागज्योतिषपूरात ठेवले.

एक दिवस त्याने अदिती – देवांच्या आईचे दागिने चोरले. स्वर्गलोकात खूप भीती पसरली. सर्व इंद्रदेवाकडे धावले व मदत मागितली. इंद्राने ही कामगिरी श्रीकृष्णावर सोपवली व नरकासूराचा वध करण्याचा आदेश दिला. श्रीकृष्ण प्रागज्योतिषपुराकडे निघाले. मार्गातील सर्व अडथळे पार करुन आत शिरले. ही घटना नरकासूराला अनपेक्षित होती. श्रीकृष्णाचे व नरकासूराचे युध्द सुरु झाले. दिवसभर युध्द करुन अखेर नरकासूर श्रीकृष्णाला शरण गेला. त्याने हात जोडून आत्तापर्यंत केलेल्या सर्व पापांची क्षमा मागितली.

आता आयुष्याचे शेवटचे काही क्षण नरकासूराच्या डोळ्यांसमोर दिसू लागले. आपण आयुष्यात काहीच चांगले साध्य केले नाही याचा त्याला साक्षात्कार झाला. रात्र संपून दिवसाची सुरुवात झाली. ह्या दिवसाला दिवाळी म्हणतात. कारण सूर्याच्या किरणांनी नरकासूराला याचा साक्षात्कार झाला. मरता मरता नरकासूराने श्रीकृष्णाकडे एक वर मागितला. *जो मनुष्य ह्या दिवशी (नरक चतुदर्शीला) पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करेल, त्याला कधी अकाली मृत्यूचा योग येणार नाही.

म्हणूनच तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी, तेजोमय निरोगी आयुष्य लाभण्यासाठी आपण यमदेवाची आठवण ठेवून दिवाळीचा दुसरा दिवस – नरक चतुर्दशी साजरी करतो. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करतात व घरातील सर्व दिवे लावून पूजा करतात.

भारतात दिवाळी हा सण नसून उत्सव आहे. घरापासून दूर रहाणारे सर्व सदस्य घरी परत येतात. ऐक्याची भावना वाढते, संस्कार केले जातात व नैतिक मूल्ये शिकवली जातात. दिवाळीमध्ये जसे आपण कुटुंबाबरोबर वेळ घालवतो, नाती जपतो, तसेच आपण निसर्गाशी असलेले नाते जपायला पाहिजे. दिवाळी साजरी करताना निरोगी राहून नैसर्गिक पध्दती वापरुन शरीराची काळजी घेतली पाहिजे.

वेळ वाचण्यासाठी खूप झटपट उपाय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मोठ्या आयुर्वेदिक कंपन्या आता उबटन / उटणे वापरुन उदवर्तनासारख्या पारंपारिक पध्दती सोडून शीट मास्क आणि सिरम सारखे निसर्गाला हानीकारक पर्याय व पॅकेजिंगवर भर देतात.

आयुर्वेदानुसार नैसर्गिक घटक वापरून बरे कसे होता येईल ह्यावर भर आहे. sustainable living आणि reusing आता luxury नसून काळाची गरज आहे. ग्रीन फार्मसीमध्ये आम्ही पूर्ण प्रयत्न करुन पारंपारिक पध्दतीने दिवाळी कशी साजरी करता येईल ह्याची काळजी घेतो. सुगंधी तेल, उटणे आणि हॅण्डमेड साबणाचा वापर करून अभ्यंग स्नानाचा आनंद घेता येईल. लक्ष्मी पूजनासाठी गोवऱ्यांपासून बनविलेली उदबत्ती व धूप, हळद कुंकू व तुपाच्या मेणबत्त्या वापरुन निरोगी मन व आनंदी घराची प्रार्थना करावी.

आयुर्वेदिक सिध्तांतानुसार वर्ष हे २ आयन म्हणजे उत्तरायण (सूर्यबळ अधिक चंद्रबळ कमी) यालाच “आदान काल” ही म्हणतात व दक्षिणायन (सूर्यबळ कमी व चंद्रबळ अधिक) यालाच “विसर्ग काल” म्हणतात. दिवाळी हा सण विसर्ग कालात येतो. यावेळी त्र्तुमानानुसार निसर्गात थंडी, रुक्षता व वायुबख अधिक असते. ‘जे ब्रम्हांडी ते पिंडी” या न्यायानुसार पावसाळ्यात वाढलेला वातदोष व नंतर शरदात वाढलेला पित्तदोष यांच्या योगाने शरीरात उष्णता व रुक्षता वाढलेली दिसते. ती कमी करण्यासाठी तेलाचे अभ्यंग व शीतल द्रव्यापासून बनलेले उटणे यांचे उद्रर्तन करण्यास सांगितले आहे. या दिवाळीच्या काळात म्हणजेच विसर्ग काळात रात्र मोठी व दिवस लहान असतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर भूक लागते. हा अग्नी प्रदीप्त करण्यासाठी व अन्नाचे नीट पचन व्हावे यासाठी सुध्दा अभ्यंगाचा खूप उपयोग होतो. विसर्गकाळात शरीरात बळ साठविले जावे यासाठी शरीराचे पोषण करणे आवश्यक असते. त्यासाठी तेलाचा अभ्यंग, व्यायाम या गोष्टी त्रह्तुचर्येतही वर्णिल्या आहेत. दिवाळीचे खाद्यपदार्थही स्निग्ध, मधुर रसाचे, पचायला जड असे जे प्रदीप्त अग्निला पूरक असतात. दिवाळीत स्वच्छ नवीन वस्त्रे, आभूषणे परिधान केली जातात. त्याने दुर्भाग्य, अलक्ष्मी, दारिद्रय याचा नाश होतो असे म्हटले जाते. ज्याचेही वर्णन त्रह्तुचर्येत आढळते, ज्यामध्ये ऋतूनुसार वाढलेला पित्त दोष व वातदोष यांचे शमन या सुगंधी तेल, अभ्यंग, उद्गर्तनाची शीतद्रव्य, आभुषणे, नवी वस्त्रे परिधान करणे या सर्व पारंपारिक गोष्टींनी होते.

Dr. Sneha Ranade
M.D Ayurved

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Start typing and press Enter to search

Shopping Cart

No products in the cart.

Previous Next
Close
Test Caption
Test Description goes like this